Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘7 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, August 7, 2023)

घराची स्वच्छता वेळच्या वेळी कराल. वडाच्या झाडाच्या सावलीत बसा. आराम मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्याल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. मनाजोगी खरेदी कराल. केलेल्या मेहनतीला यश येईल. आवडता पोषाख परिधान कराल.

शुभरंग : पोपटी

वृषभ (TAURUS – Monday, August 7, 2023)

मोगऱ्याचा गजरा केसात माळा. मन प्रसन्न राहिल, अशी कामे करा. कार्यालयातून लवकर घरी जाण्याचा बेत आखाल. मित्रांसोबत पार्टी करण्याची इच्छा होईल. आर्थिक योजना आखताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. सामाजिक कार्यात भाग घ्याल. ताणतणाव दूर होतील. कार्यालयात वरिष्ठ कौतुक करतील. आजचा दिवस आपल्यासाठी वेगळा असेल. आहाराच्या वेळा पाळा.

शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Monday, August 7, 2023)

रात्री खरकटी भांडी ठेवू नका. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. एकांतात वेळ घालवाल. रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात घालवाल. सकाळी सात्त्विक स्वप्न पडण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी दूरच्या नातेवाईकांकडून कानावर येण्याची शक्यता आहे. आवडता पोषाख परिधान करा. आनंदी राहाल. शिवपिंडीवर अभिषेक घाला.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER – Monday, August 7, 2023)

आहारात मधाचा समावेश करा. अंगदुखी दूर होण्यासाठी औषध घ्यावे लागेल. घरातील आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. घरात गुलाबाच्या फुलांचे अत्तर शिंपडा. रिकामा वेळ जोडीदारासोबत फिरण्यात घालवाल. व्यसन टाळा. मनाजोगी खरेदी कराल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. निसर्गाचा मनमुराद आनंद उपभोगाल.

शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Monday, August 7, 2023)

धूम्रपान टाळा. विनोदबुद्धी जागृत ठेवा. आताच पैसे काटकसरीने वापरायला शिका म्हणजे भविष्यात त्याचा उपयोग होईल. प्रिय व्यक्तिला भेटलात की, मनाची मरगळ दूर होईल. उधळेपणा टाळा. झोपताना चटईचा वापर करा. छंद जोपासा. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. चांदीची अंगठी बोटात घाला.

शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Monday, August 7, 2023)

प्रत्येक व्यक्तिचे बोलणे मनापासून ऐकाल. अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. शरीर उत्तम राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्या. आजचा दिवस उत्साहात जाईल. नातेसंबंध जपाल. कोणत्याही नदीच्या प्रवाहात काळे आणि पांढरे तीळ प्रवाहित करा. प्रियकर आणि प्रेयसीमधील संबंध चांगले राहतील. गरम पाणी प्या.

शुभरंग : राखाडी

तूळ (LIBRA- Monday, August 7, 2023)

आशावादी राहाल. मित्र तुमचे भरभरून कौतुक करतील. पैसे कमवण्याची नवीन संधी लाभदायक ठरेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य प्रोत्साहन देतील. आजचा दिवस प्रेमाची उणीव भरून काढणारा असेल. नातेवाईक अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे. आवडती कला जोपासाल. जुनी देणी वसूल कराल.

शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Monday, August 7, 2023)

कोणतेही झाड किंवा वनस्पतीची खोडे तोडू नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक कराविशी वाटू शकते. घरात सुख, शांती समाधान आणि समृद्धी येईल. रिकाम्या वेळेत एखाद्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करा. पोटाची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नका.

शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Monday, August 7, 2023)

पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आरोग्य चांगले राहिल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. वेळेचा सदुपयोग कराल. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. जोडीदासोबत सायंकाळी वेळ घालवाल. आहारातील पथ्ये पाळाल. सौंदर्याची काळजी घ्याल.

शुभरंग : राखाडी

मकर ( CAPRICORN – Monday, August 7, 2023)

केळीच्या झाडाला पाणी घाला. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. दिनचर्या व्यस्त राहिल. मित्रांसोबत गप्पा माराल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्याल. सकाळी हिरव्यागार गवतावरून अनवाणी चाला. लोकं तुमचे मत विचारात घेतील. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरात श्रीविष्णुसहस्त्रनामावलीचा पाठ करा.

शुभरंग : चंदेरी

कुंभ (AQUARIUS – Monday, August 7, 2023)

कपाळावर पांढरा चंदनाचा टिळा लावा. मानसिक शांतता मिळेल. नवीन मित्र जोडाल. घरातील जवळच्या व्यक्तिसोबतत वेळ घालवावासा वाटेल. नदीकिनारी किंवा एखाद्या बागेत फिरायला जावेसे वाटेल. मानसिक शांतता मिळेल. देवीचे स्तोत्र वाचा. घरातील तांत्रिक वस्तूंची वेळच्या वेळी दुरुस्ती करून घ्या.

शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Monday, August 7, 2023)

गंगाजल प्या.स्वत:च स्वत:वर औषधोपचार करायला जाऊ नका. पुढच्या पिढीसाठी आधीच नियोजन करून ठेवाल. नात्याचे महत्त्व कळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आजचा दिवस आनंददायी असेल. मनाजोगी खरेदी कराल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा माराल. प्रिय व्यक्तिशी अतिभावूक होऊन बोलू नका.

शुभरंग : काळा