Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’15 जुलै’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, July 15, 2023)
तांब्याचा शिक्का खिशात ठेवा. ताणतणावापासून मुक्त व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. समस्यांचे निराकरण होईल. कुटुंबासाठी वेळ द्याल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : निळा

वृषभ (TAURUS – Saturday, July 15, 2023)
विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करा. प्रवासाची संधी शोधाल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवाल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. पाकिटात चांदीचे नाणे ठेवा. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला. सायंकाळचा वेळ मित्रमंडळींसोबत सिनेमा पाहण्यात घालवाल.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Saturday, July 15, 2023)
गुलाबी रंगाचे कपडे घालून प्रिय व्यक्तिला भेटायला जा. अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. घरातील लोकांसोबत उत्साहवर्धक गोष्टी कराल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ घालवाल. आजची दिनचर्या व्यस्त असेल. अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : लाल

कर्क (CANCER – Saturday, July 15, 2023)
लहान मुलींना खीर खाऊ घाला. दररोज केलेल्या व्यायामामुळे व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. व्यसन टाळा. मौल्यवान वस्तू जपावी लागेल. सहकाऱ्याकडून सल्ला घ्यावा लागेल. घराच्या अंगणात लाल रंगाच्या गावठी गुलाबाचे झाड लावा. घरातील पसारा आवरायला पत्नीला मदत कराल. सहकर्मी मदत करतील.
शुभरंग : मोरपिसी

सिंह (LEO – Saturday, July 15, 2023)
उत्तम स्वास्थ्याकरिता आहाराची पथ्ये पाळावी लागतील. किमती वस्तूंची काळजी प्रवासादरम्यान घ्यावी लागेल. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मनमोकळ्या गप्पा प्रिय व्यक्तिसोबत मारण्याकरिता वेळ काढाल. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Saturday, July 15, 2023)
पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला. आरोग्य चांगले राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. अतिसाहस करायला जाऊ नका. मनाजोगी खरेदी कराल. प्रिय व्यक्तीसोबत बोलताना वादाचे विषय टाळा. घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. आहारात विविध प्रकारच्या सुप्सचा समावेश करा.
शुभरंग : चॉकलेटी

तूळ (TULA- Saturday, July 15, 2023)
गाईला गूळ खाऊ घाला. आपल्या विनयशील वागण्याचे कौतुक होईल. लोकं तुमच्या म्हणण्याचा विचार करतील. टीव्ही किंवा मोबाईलवर सिनेमा पाहण्यात वेळ घालवाल. आजचा दिवस आरामात जाईल. आवडती कला जोपासाल. एकांत मिळेल. आवडीची पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : नारिंगी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, July 15, 2023)
तांब्याचा कडा हातात घाला. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. एकटेपणावर मात कराल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. सध्या कोणालाही पैसे उधार देऊ नका. घरातील कामे वेळेवर पूर्ण कराल. भविष्यातील योजना आखण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त आहे. आरामाचे क्षण वाया घालवू नका. निवांतपणे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : हिरवा

धनु (SAGITTARIUS – Saturday, July 15, 2023)
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. कामाच्या सुटसुटीत वेळेमुळे विश्रांतीसाठी वेळ मिळेल. इतरांचा विचार कराल. आपले मत मांडताना घाबरू नका. कार्यालयाची वेळ पाळावी लागेल. लोकं तुमचा आदर करतील. आपले मत विचारात घेतले जाईल. स्वत:साठी काहीतरी करावे, असे वाटेल. आहारात अति मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आवडती वस्तू खरेदी कराल.
शुभरंग : पिवळा

मकर ( CAPRICORN – Saturday, July 15, 2023)
पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. घराबाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाल. मन शांत राहिल. एखाद्या धार्मिक ठिकाणी यात्रेला जाल. प्रिय व्यक्तिची साथ मिळेल. नवीन कपड्यांची खरेदी कराल.
शुभरंग : निळा

कुंभ (AQUARIUS – Saturday, July 15, 2023)
मन प्रसन्न राहिल. शंकराची पूजा करा. आरोग्य चांगले राहिल. आयुष्याकडे दु:खी चेहऱ्याने पाहू नका. नवीन ओळखी होतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मन मारून जगू नका. बाहेरचे खाणे महागात पडेल. प्रिय व्यक्तीवर नाराज होऊ नका. मित्रमंडळींशी संपर्क साधाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : केशरी

मीन (PISCES – Saturday, July 15, 2023)
घरात प्लास्टर ऑफ पॅरिसचे शो पीस ठेवा. जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर गेल्यामुळे नाते घट्ट होईल. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. ताणतणाव आणि दडपणावर मात कराल. अति बोलण्यात वेळ वाया घालवू नका. गणपतीला 21 दुर्वा वाहा.
शुभरंग : पोपटी