Baba Vanga प्रयोगशाळेत मुलांचा जन्म, एलियन्सचा हल्ला अन् अणुयुद्ध, 2023बाबत झोप उडवणारी भविष्यवाणी

बल्गेरियन गूढवादी महिला बाबा वेंगा अर्थात वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हिची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. 2022बाबत केलेले दोन अंदाजही खरे ठरल्याने आता 2023मध्ये बाबा वेंगा हिच्या मते काय होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. बाबा वेंगा हिने 2023बाबत पाच भविष्यवाणी केल्या आहेत. या खऱ्या ठरल्या तर जगात मोठी उलथापालथ होईल.

– 2023 साठी बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीमध्ये काही विचित्र वैज्ञानिक शोधांचा देखील समावेश आहे, ज्यापैकी एक प्रयोगशाळेत मुलांचा जन्म होईल याचाही समावेश आहे. तसेच प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.

– एक मोठा देश 2023मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांचे संदर्भ पाहिल्यास रशिया-युक्रेन वाद विकोपाला पोहोचला आहे. युद्ध ताणले जात असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अणुबॉम्ब वापरण्याचे संकेत दिले आहेत. यानुसार बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरू शकते.

– 2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

– 2023 मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

– 2023मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.

बाबा वेंगा यांनी यापूर्वी काय केल्या होत्या भविष्यवाणी?

बाबा वेंगा यांनी यापूर्वी देखील भयानक भविष्यवाणी केल्या होत्या. अमेरिकेतील 9/11चा हल्ला आणि कुर्स्क पाणबुडी दुर्घटना या अलीकडील इतिहासातील काही सर्वात भयानक घटनांचे भाकितही वेंगा हिने केले होते. तसेच 20व्या शतकामध्ये महामारी पसरेल असेही तिने म्हटले होते. कोरोना महामारी जगभरात पसरल्याने तिची ही भविष्यवाणीही खरी ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तसेच 2022मध्ये ऑस्ट्रेलियात आलेल्या महापुराचेही भाकित तिने वर्तवले होते.

कोण आहे बाबा वेंगा?

वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा अर्थात बाबा वेंगा ही एक अंध बल्गेरियन गूढ उपचार करणारी महिला होती. सन 1996 मध्ये तिचे निधन झाले. अंध असलेल्या या ज्योतिषी महिलेने स्वतःच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती.