बेरोजगारांना फसविणाऱया भामटय़ांची टोळी गजाआड

परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी आणि अर्ज केल्यावर झटपट व्हिसा पण काढून देणार अशी जाहिरातबाजी करून शेकडो बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालणाऱया पाच जणांना गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने अट केली.

शहरात विविध ठिकाणी प्लेसमेंट एजन्सीचे कार्यालय थाटून परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देणार अशी जाहिरात करून काही भामटय़ांनी बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा गुन्हा एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर युनिट-5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक सदानंद येरेकर, बाळासाहेब शिंदे, अजित गोंधळी, सपोनि अमोल माळी, जयदीप जाधव, उपनिरीक्षक विजय बेंडाले व पथकाने तपास सुरू केला होता. आरोपींची टोळी असून ते दिल्ली, बिहार, यूपी, भिवंडी व मुंबईत कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाच पथके बनवून टोळीचा म्होरक्या राहुलकुमार चौधरी (22), रामकृपाल कुशवाह (45), रोहित सिन्हा (33), आशीषकुमार माहातो (30), आमितोष गुप्ता (22) यांना बेडय़ा ठोकल्या.  या अटक केलेल्या आरोपींकडून बेरोजगार तरुणांचे 63 पासपोर्ट, सात बनावट व्हिसा, स्टिकर्स व कागदपत्रे, पाच संगणक, पाच लॅण्डलाइन आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. a