घाटघर, रतनवाडीत तब्बल 10 इंच पाऊस

नगर जिल्ह्याची ‘चेरापुंजी’ म्हणून निसर्गप्रेमींनी लोकप्रिय ठरविलेल्या घाटघर व रतडीस गुरुवारी पावसाने रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या 24 तासांत घाटघर व रतनवाडीस 10 इंचांहून अधिक पाऊस कोसळला. शिवाय घाटघर व रतनवाडीस 2023 वर्षांतील सुमारे 50 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.

गुरुवारी (27 जुलै) घाटघर व रतनवाडी परिसरातून 2023च्या पावसाळ्यातील एकूण पावसाची नोंद तीन हजार मिलिमीटरहून अधिक झाली. भंडारदरातील पाणीसाठय़ात पाऊस जोरदार कोसळत असल्याने धरणातून 12 हजार 119 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग केला जात असून भंडारदरात 741 दलघफूट नवीन पाणी आले. तर शुक्रवारी 8320 दलघफूट क्षमतेच्या निळवंडे धरणात पाणीसाठा 5051 दलघफूट झाला.