नालेसफाईचे निम्मे काम फत्ते!

पावसाळा दीड महिन्यावर आल्यामुळे पालिका नालेसफाई वेगाने करीत असून आतापर्यंत 54.17 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे, तर मिठी नदीचे सर्वाधिक 70.67 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कर्षी नालेसफाई उशिरा सुरू झाली असली तरी मार्चमध्ये 5 टक्के, एप्रिलमध्ये 30 टक्के आणि 31 मेपर्यंत उर्करित 40 टक्के नालेसफाई केली जाणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

पालिकेकडून दरकर्षी मार्चच्या पहिल्या आठकडय़ापासून मोठे नाले, छोटे नाले, गटारे आणि पर्जन्य जलकाहिन्यांची सफाई केली जाते. मात्र या कर्षी निकिदा प्रक्रिया रखडल्याने पहिल्या आठकडय़ात सुरू होणारे काम उशिरा सुरू झाले. तरीदेखील पालिकेने सद्यस्थितीत नालेसफाईच्या कामाला गती दिली असून पावसाळय़ाला दीड महिना शिल्लक असताना निम्म्याहून जास्त नालेसफाई पूर्ण केली आहे.