हेमंत सोरेन सुप्रीम कोर्टात

ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईला आव्हान देणाऱया याचिकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, मात्र आजतागायत निर्णय दिलेला नाही, असे नमूद करत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करायचा असल्याने याचिकेवर तातडीने निर्णय व्हावा. अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती सोरेन यांनी केली आहे.