कोरोना लसीने अचानक मृत्यूत वाढ नाही

कोरोनो लस घेतल्याने देशात मृत्यूत वाढ होत आहे, अशी भीती वर्तवली जात होती. परंतु, कोरोना लसीने अचानक मृत्यूत वाढ होत नाही, असा दावा ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर)केला आहे. ‘आयसीएमआर’च्या अभ्यासानुसार, रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यामुळे, आकस्मिक मृत्यूचा काwटुंबिक इतिहास आणि जीवनशैलीच्या काही सवयीमुळे कोरोनादरम्यान अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. उलट लसीचा एक डोस घेतला असल्यास आकस्मिक मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असेही या अभ्यासात म्हटले आहे.