मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी वाहतूक मार्गात बदल

पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. 33/800 येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.166 डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम 28 नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 3 वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे 1 कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरू राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी 3 वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर सपंर्क साधावा, असं महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीनं कळविण्यात आलं आहे.