शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात महत्त्वाची बातमी

Supreme Court Uddhav Thackeray Eknath Shinde

 

शिवसेना आमदारांना फोडून शिवसेना पक्ष पळवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना सुनावणी घेण्यास सांगण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितील. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी 5 एप्रिल रोजी होणार असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आता संगणकीय तारीख 23 एप्रिल दाखवत असल्याचं वृत्त एबीपी वृत्तसमूहानं प्रसिद्ध केलं आहे. ही तारीख संगणकीय प्रणालीद्वारे मिळाली असल्यानं ती तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही सुनावणी 5 एप्रिल रोजीच होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उद्यापर्यंत ही तारीख स्पष्ट होईल असं बोललं जात आहे.

दरम्यान, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून मूळ कागदपत्र मागवले होते. पुढच्या तारखेला यावर सुनावणी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय करणार का? याबद्दलचा निर्णय होणार होता.