पराभवाचे उट्टे फेडले! हिंदुस्तानचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; कोहली ठरला शिल्पकार

विश्वचषकाच्या आजच्या महत्वाच्या लढतीत हिंदुस्तानने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव केला. तब्बल दोन दशकांनी हिंदुस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयासह हिंदुस्तानने मागील विश्वचषकाच्या पराभवाचे उट्टे फेडले. हिमालयाच्या कुशीत रंगलेल्या या नेत्रदीपक लढतीत टीम इंडियाने विश्वचषकातील सलग पाचवा विजय संपादित करून गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावले.

हिंदुस्तानच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरल तो किंग कोहली. कोहलीने अवघ्या 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा कुटल्या. कर्णधार रोहित (46) आणि अष्टपैलू जडेजाच्या (39) साथीने हिंदुस्तानने विजय पंच लगावला. विजयासाठी 5 धावा शिल्लक असताना कोहलीही सचिनच्या एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांशी बरोबरीसाठी तितक्याच धावांची आवश्यकता होती. कोहलीने लगावलेल्या फटका सीमारेषे पार जाऊ शकला नाही आणि कोहली बाद झाला. पुढे जडेजाने चौकार लगावत उरलेली औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी, हिदुस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलांदाजांनी निर्णय सार्थकी ठरवत हिल्या 19 धावात पाहुण्या्च्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. डॅरी मिशेलचे शतक (130) आणि मूळ भारतीय वंशाच्या रचिन रविंद्र (75), धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा केल्या होत्या. हिंदुस्तानकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 बळी घेतले.

पराभवाचा सिलसिला खंडीत
हिंदुस्तानने तब्बल 20 वर्षांनंतर न्यूझीलंडवर विजाय मिळवला आहे. याआधी साल 2003 च्या दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर कोणत्याही आयसीसीच्या (एकदिवसीय, टी-20 विश्वचषक, आणि टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेत हिंदुस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले नव्हते. त्यातच 2019 च्या विश्वचषकात उपांत्य फेरीतील हिंदुस्तानचा केलेला पराभव सर्वच हिंदुस्तानीच्या जिव्हारी लागला होता. आजच्या विजयामुळे हिंदुस्तानने पराभवाचा सिलसिला खंडीत तर केलाच त्यासोबतच मागील विश्वचषकाच्या पराभवाचे उट्टेही फेडले.