IPL 2024 : चेन्नईचा मोठा विजय

आयपीएलमध्ये धावांचा आणि षटकारांचा पाऊस पाडणारा हैदराबादचा संघ चेन्नईसमोर 134 धावांत ढेपाळला आणि चेन्नईने 78 धावांचा मोठा विजय मिळवत आयपीएलच्या ‘दस का दम’ गुणतालिकेत दहा गुण मिळवणारा सहाव्या संघाचा मान मिळवला.

चेन्नईने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 98 धावांच्या झुंजार खेळीमुळे 3 बाद 212 अशी मजल मारली. ऋतुराजने 54 चेंडूंत 98 धावा फटकावताना डॅरिल मिचेलसह (52) दुसऱया विकेटसाठी 107 धावांची भागी रचली तर शिवम दुबेसह (39) तिसऱया विकेटसाठी 74 धावांची भर टाकली. त्यानंतर चेन्नईच्या 213 धावांचा पाठलाग करणारा हैदराबादचा संघ तुषार देशपांडे आणि मुस्तफिझूर रहमानच्या माऱयापुढे अक्षरशः कोसळला. आज हैदराबादच्या ना हेडची बॅट लागली ना क्लासन तुटून पडला. अभिषेक शर्मा आणि एडन मार्करमही लवकर बाद झाले. देशपांडेने 27 धावांत 4 विकेट टिपताना तिन्ही आघाडीवीरांना लवकर बाद केले. मुस्तफिझूर आणि मथिशा पथिराणाने प्रत्येकी 2 विकेट टिपले.