ज्यांना गद्दारी करून पैसा आणि सत्ता मिळाली आहे…. भाजप आमदाराचे मिंधेंना शाब्दिक तडाखे

एकिकडे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल सुरू असल्याचा देखावा उभा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र मिंधे-फडणवीस सरकारमधली धुसफूस काही ना काही कारणाने उघड होताना दिसत आहे. भाजप आमदाराला विदूषक म्हणणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे यांना भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

सोमवारी मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे पाहणी करायला गेले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि मनसेचे आमदार राजू पाटील तुमच्यावर टीका करतात, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी कोणीही विदूषक उठतो आणि माझ्यावर टीका करतो, असं विधान केलं होतं.

त्याला उत्तर देताना ‘ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळालं आहे, त्यांना सगळं जग विदूषक असल्याचा भास होतो’, अशा शब्दांत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तडाखे दिले आहेत.