साळशिरंबेत बैलगाडी शर्यतीचा थरार, सुपनेची बैलगाडी ठरली सहकारमहर्षी किताबाची मानकरी

कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 180 गाडय़ांनी सहभाग घेतला होता. सुपने येथील साईराज पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावत रोख बक्षिसासह सहकारमहर्षी किताबाचा मान मिळविला.

कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंकज पाटील मित्र परिवाराच्या वतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये साईराज पाटील (सुपने) यांच्या गाडीने प्रथम, पाचुंब्री वाटेगाव येथील पैलवान ग्रुपने दुसरा, काले येथील जोतार्ंलग प्रसन्न ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला आहे. एकूण 33 गटांत 180 बैलगाडय़ांनी सहभाग घेतला होता.

दयानंद पाटील, संजय शेवाळे सरपंच सवादे, काकासा धर्मे, हणमंत जाधव, विवेक पाटील, तानाजी देशमुख डॉ. सुरेश पाटील, रामभाऊ सातपुते, चंद्रकांत पाटील, मानसिंग कदम, प्रवीण थोरात, दिलीप पाटील, अभिजित कोठावळे, शरद पाटील उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांचे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले यांनी अभिनंदन केले. बबलू देसाई, पोपट देसाई यांनी समालोचन केले, तर पंकज पाटील यांनी आभार मानले.