उन्हाळ्यात वकिलांना काळा गाऊन न घालण्याची मुभा

कोलकाता येथे पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता हायकोर्टाने वकिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. कोलकाता हायकोर्टातील वकिलांना काळा गाऊन परिधान करण्यापासून सूट देण्यात आली. याबाबत कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती टी.एस. शिवग्ननम यांनी निर्देश दिले. कोलकाता आणि आजूबाजूच्या जिह्यांमध्ये उष्णतेची लाट पुढील किमान पाच दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे लक्षात घेऊन हायकोर्टाने अधिसूचना काढली. ‘‘उष्णतेच्या लाटेसह प्रतिकूल हवामानाचा विचार करून उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत अॅडव्होकेट गाऊन परिधान करण्यावर सूट देण्यात आलीय.