भर उन्हात प्रवाशांची लाहीलाही, एक बसस्थानक रखडले तर दुसऱ्याच्या दुरूस्तीमुळे प्रवासी रस्त्यावर

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना बससाठी उन्हातान्हात उभे रहावे लागते.त्यात आता रहाटाघर या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना बससाठी बसस्थानकाबाहेर उन्हातान्हात उभे रहावे लागते.त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

रत्नागिरी बसस्थानकाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. बसस्थानकाचे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांना बससाठी रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. बससाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे रहात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. त्याठिकाणी एक शेड उभी करण्यात आली आहे मात्र ती शेड पुरेशी नाही.

रत्नागिरीतील रहाटाघर बसस्थानकातही काम सुरू आहे.याकामामुळे एसटी बसस्थानकाबाहेर थांबत आहे.त्यामुळे प्रवाशांना बससाठी बसस्थानकाबाहेर उन्हात उभे रहावे लागते.याठिकाणी तात्पुरते ग्रीननेट टाकण्यात आले आहे मात्र ते पुरेसे नाही.भर उन्हात बसची प्रतिक्षा करताना प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.