हुकूमशाही की लोकशाही? लोकसभेच्या रणसंग्रामाची घोषणा;19 एप्रिल ते 1 जून, सात टप्प्यांत मतदान

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकशाहीचा जागर हिंदुस्थानात सुरू झाला आहे. लोकसभेच्या या महासंग्रामात हुकूमशाही की लोकशाही याचा फैसला आता जनतेच्या न्यायालयात होणार आहे. 18व्या लोकसभेसाठी देशातील 543 मतदारसंघांत 19 एप्रिल ते 1 जून या काळात एकूण 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्व टप्प्यांचे मतदान पार पडल्यावर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 19 आणि 26 एप्रिल, 7, 13 आणि 20 मे असे पाच टप्प्यांत मतदान होईल, अशी घोषणा पेंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील.

18 व्या लोकसभेसाठी निवडणूक आचारसंहिता लागू
टप्पा दिनांक मतदारसंघ
पहिला     19 एप्रिल 102
दुसरा      26 एप्रिल 89
तिसरा     7 मे 94
चौथा      13 मे 96
पाचवा    20 मे 49
सहावा    25 मे 57
सातवा    1 जून 57

पैसेवाटपाची तक्रार… 100 मिनिटांत पथक पोहचणार
कुठे पैसावाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून ‘सी व्हिजील’ अॅपवर टाका, तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रक करून 100 मिनिटांत टीम तिथे पोचतील.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा
85 वर्षांपेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म 12 डीच्या माध्यमातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल.

96 कोटी 88 लाख मतदार
49.7 कोटी पुरुष तर 47.1कोटी महिला
19 कोटी 74 लाख तरुण मतदार आहेत
100 वर्षावर 2 लाख 18 हजार 442 मतदार
85 वर्षावरील 81 लाख 88 हजार मतदार
दिव्यांग मतदारांची संख्या 88 लाख
1 कोटी 80 लाख मतदार
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार
48 हजार तृतीय पंथीय मतदारांची नोंद

चार ‘एम’चे आव्हान
मनी, मसल, मिस इन्फॉर्मेशन आणि मॉडेल कोड ऑफ पंडक्ट या चार ‘एम’चे निवडणूक आयोगापुढे आव्हान असून, यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य आयुक्तांनी सांगितले.

प्रचारात भाषेचा स्तर जपा
अलीकडच्या काळातील आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार पँपेनर्सनादेखील नोटीस देण्यात येणार आहे. निवडणुकीचा प्रचार करताना प्रचारकांनी भाषेचा स्तर जपावा. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी केले.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये
19 एप्रिल ते 20 मे दरम्यान मतदान होईल.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान

पहिला टप्पा 19 एप्रिल
मतदारसंघ 4 : रामटेक, नागपूर,
भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

दुसरा टप्पा 26 एप्रिल
मतदारसंघ 8 : बुलढाणा, अकोला, अमरावती,
वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.

तिसरा टप्पा 7 मे
मतदारसंघ 11 : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे
मतदारसंघ 11 : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी, बीड.

पाचवा टप्पा 20 मे
मतदारसंघ 13 : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई.

मुंबई, ठाण्यात 20 मे रोजी मतदान
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी एकाचवेळी मतदान होणार आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत तर महामुंबईचा भाग असलेले ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर असे चार मतदारसंघ या सर्व ठिकाणी 20 मे रोजी जनतेचा काwल मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला अधिसूचना निघेल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे असेल, 4 मे रोजी छाननी होईल आणि 6 मे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.

अकोला विधानसभा पोटनिवडणूक
देशभरातील 26 विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.