माता-भगिनींचे कुंकू मोदीच हिरावून घेत आहेत; तेजस्वी यादव यांचा मोदी सरकावर निशाणा

काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांची संपत्ती जास्त मुले असलेल्या लोकांमध्ये वाटतील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांचा राष्ट्रीय जनता दलाचे नेते जेतस्वी यादव यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. आमच्या माता-भगिनी या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळसूत्र घालतात. त्यांचे कुंकू मोदीच हिरावून घेत आहेत, असा हल्ला तेजस्वी यादव यांनी मोदींवर केला. तब्बल 800 शेतकऱयांना आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागला त्यांचे कुंकू कुणी हिरावून घेतले, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

प्रचारसभा आटोपून पाटणा विमानतळावर दाखल झालेल्या तेजस्वी यादव यांना पत्रकारांनी मोदींच्या विखारी वक्तव्याबद्दल विचारले असता तेजस्वी यादव यांनी मोदींनाच फैलावर घेतले. 2014मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 24 हजार रुपये होती, आज हीच किंमत कित्येक पटींनी वाढून तब्बल 73 हजार झाली आहे. आज देशातील तब्बल 95 टक्के महिला मंगळसूत्रदेखील खरेदी करू शकत नाहीत, असे तेजस्वी यादव म्हणाले. देशातील माता-भगिनींचे कुंकू हिरावून घेणारी कृत्ये लपवून तसेच सध्याच्या ज्वलंत मुद्दय़ांवरून देशातील जनतेचे लक्ष हटवून आता मोदी मंगळसुत्राबद्दल बोलत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

नड्डा आपल्यासोबत बॅगा घेऊन आलेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी यादव आपल्यासोबत भरपूर बॅगा घेऊन आले आहेत. जिथे निवडणूका आहेत तिथेते या बॅगांचे वाटप करत आहेत, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपावर केला आहे. तसेच या बॅगांमध्ये नेमके काय आहे हे निवडणूक आयोगाने तपासावे असे आवाहनही केले आहे.