महाराष्ट्र एनसीसीची हॅटट्रिक, सलग तिसऱयांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान

महाराष्ट्र एनसीसीने पुन्हा एकदा या वर्षी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ प्रदान करून गौरवण्यात आले. ‘महाराष्ट्र एनसीसी’ने सलग तिसऱयांदा हा बहुमान मिळवला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनाच्या विशेष शिबिरात महाराष्ट्र संचालनालयाला प्रतिष्ठsचा ‘पंतप्रधान ध्वज’ प्रदान करण्यात आला. देशात एनसीसीची 17 संचालनालये आहेत. या सर्व संचालनालयांमधील निवडक छात्रसैनिकांचे प्रजासत्ताक दिन शिबीर दिल्लीत होते. या शिबिराचा समारोप वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या व एकूणच शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये चांगले कार्य केलेल्या संचालनालयाला मानाचा ध्वज व चषक प्रदान सोहळय़ाद्वारे होतो. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये महाराष्ट्र संचालनालयाला ध्वज व चषक प्रदान करण्यात आला.

18 वेळा मिळवला मानाचा ध्वज

महाराष्ट्र संचालनालयाने या आधी 18 वेळा पंतप्रधान ध्वज पटकावला आहे. 2002 ते 2013 यादरम्यान सलग 12 वेळा महाराष्ट्र संचालनालय विजेते होते. 2020, 2021 मध्ये संचालनालय उपविजेते ठरले. 2022, 2023 व 2024 अशी सलग तीन वर्षे संचालनालयाने ध्वज मिळवला आहे.