अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ते झोपले होते; लोकायुक्त कायद्यावरून भास्कर जाधवांचा पलटवार

लोकायुक्त विधेयक आता विधान परिषदेत मंजूर झाले आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे.

या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे. अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांना विचारला आहे. आता लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर 88 व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेन. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला, असेही अण्णा हजारे म्हणाले होते. त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.