शरद पवार यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. या शपथनाम्यात घरगुती वापराचा गॅसपासून अग्निवीर योजनपर्यंत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी याचा विचार शपथनाम्यात करण्यात आला आहे. तसेच शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण यासाठी महत्त्वाच्या घोषणा त्यात आहे. या शपथनाम्याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली.

शपथनाम्यातील महत्त्वाची आश्वासने

  • महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्यात येणार.
  • गॅसच्या किमती करून या 500 रुपयांपर्यंत निश्चित करून केंद्र सरकरकडून सबसिडी देण्याचा विचार.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करण्यावर भर.
  • केंद्र सरकारमध्ये 30 लाख शासकीय नोकऱ्यांमधील रिक्त जागा भरणार.
  • राज्याच्या हक्क आणि अधिकारात केंद्राची ढवळाढवळ होण्याची शक्यता असणारे घटनेतील कलम ३५६ रद्द करणार
  • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख मदत देणार.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार.
  • डिग्री आणि डिप्लोमा झाल्यावर विद्यार्थ्याला साडेआठ हजार शिष्यवृत्ती देणार.
  • महिला आणि मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करणार
  • शाळा कॉलेजचे सेफ्टी ऑडिट करणार
  • देशातील अल्पसंख्याकांना प्रगतीच्या संधीसाठी  ‘सच्चर आयोगा ’च्या शिफारशींची अंमलबजावणी करणार.
  • सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करणार
  • आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करणार
  • खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवणार
  • शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर ठरवण्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करणार
  • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार
  • खाजगीकरणावर मर्यादा आणणार
  • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार
  • आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करणार
  • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करणार
  • सत्तेत आल्यास अग्निवीर योजना बंद करणार
  • वन नेशन वन इलेक्शन सध्या योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करणार