10 रुपयांची नाणी जमवून घेतली इलेक्ट्रीक स्कूटर

आपली आवडती वस्तू घेण्यासाठी लोक पै पै जमवतात. आयुष्यभराची पुंजी खर्च करतात. एका इसमाने आपली आवडती स्कूटर 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली. त्याच्या या कृतीमुळे तो चांगलाच चर्चेत आलाय.

दुचाकी चालवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार दुचाकी उपलब्ध करून देण्याच्या कंपन्यांमध्येही स्पर्धा वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रीक स्कूटरकडेही ग्राहकांचा ओढा आहे. जयपूरमधला एक इसम स्कूटर खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये चेक किंवा डिजिटल पेमेंट न करता 10 रुपयांची नाणी घेऊन गेला. पिशव्यांमध्ये ही नाणी होती. ती देऊन त्याने स्कूटर खरेदी केली. कंपनीच्या सीईओने या ग्राहकाचा फोटो शेअर करत त्याचे कौतुक केले. याआधी 2022 साली तामीळनाडू येथील ग्राहकाने एक रुपयाची 2.6 लाख नाणी देऊन स्कूटर खरेदी केली होती. ही नाणी ंमोजण्यासाठी 10 तास लागले होते.