अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बारमध्ये अंधाधुंद गोळीबार; 5 ठार, 6 जण रुग्णालयात दाखल

कॅलिफोर्नियात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले तर किमान सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली, अशी माहिती डेली मेल ऑनलाइनने दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत गोळी झाडल्यानंतर संशयिताचा मृत्यू झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या सहा जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संशयितासह एकूण 11 जणांवर गोळीबार झाला, तर सुरक्षारक्षांना कोणतीही दुखापत झाली नाही. सीबीएस न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, निवृत्त अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यात झालेल्या भांडणानंतर संतापून त्यानं गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि ब्युरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, फायरआर्म्स अँड एक्सप्लोझिव्ह (एटीएफ) या प्रकरणाचा तपास करत आहेत.