मंचर येथे शांता शेळके यांचे स्मारक उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंचर येथील वाडय़ात ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांचे  बालपण गेले. हा ऐतिहासिक वाडा अलीकडील मुसळधार पावसात अंशतः कोसळल्यानंतर त्या जागेवर आता शांताबाईंचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार आहे. शांताबाई आणि आंबेगावचे अतूट नाते होते. आंबेगावच्या भूमीत संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आणि याच भूमीत त्यांनी मराठी साहित्याला अनेक कविता आणि गीतांचा अमूल्य ठेवा दिला. त्यांनी लिहिलेली अनेक अजरामर गीते, काव्य आजही रसिकांच्या ओठी आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शांताबाईंचे वास्तव्य असलेल्या वाडय़ाचा काही भाग कोसळला.