मुलुंडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार

दोघा तरुणांनी एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

मुलूंड येथील झोपडपट्टी परिसरात पिडीत मुलगी तिच्या आईसोबत राहते. या गुह्यातील मुख्य आरोपी हा पिडीत मुलीच्या आईच्या ओळखीचा आहे. मे महिन्यात आरोपीने अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही बाब त्याने मित्राला सांगितली.मग दोघांनी मिळून त्या मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरकडे नेले. तेव्हा ती मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची बाब निष्पन्न झाली. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केल्यावर दोघाआरोपींनी मुलीवर बलात्कार केला होता, अशी माहिती समोर आली.त्यानुसार पोलिसांनी तत्काळ बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल करून एका 21 वर्षाच्या आरोपीला अटक केली. तर गुह्यातील मुख्य आरोपी 37 वर्षीय तरुण पसार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, त्या दोघांनी पेयामध्ये गुंगीचे औषध मिक्स करून ते पिण्यासाठी दिले होते. ते प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली. मग दोघांनी मिळून तिचे शारीरिक शोषण केल्याचे मुलीचे म्हणणे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.