एक ‘नाथ’ आहे घरी म्हणून ही मुजोरी? श्रीकांत शिंदेंना पॉकेटमनीसाठी MMRDA, MSRDC चा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे दोघे भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा बॉम्बगोळा कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी टाकला होता. आता यापुढे एक पाऊल टाकत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दादागिरीचा ट्वीटच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे. एक ‘नाथ’ आहे घरी म्हणून ही मुजोरी? बापाने पॉकेटमनीसाठी एमएमआरडीए, एमएसआररडीसीचा निधी दिल्यामुळे करोडोच्या बाता मारल्या जात आहेत. या निधीमुळे कल्याण-डोंबिवलीच्या समस्या मात्र सुटल्या नाहीत. रेल्वेच्या प्रवाशांना तर रोज मरणयातना भोगाव्या लागतात असा हल्लाबोल राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून करत मिंधेंचा खरपूस समाचार घेतला आहे.

कल्याण-डोंबिवलीतील भाजप आणि मनसे पदाधिकारी सातत्याने मिंधे गटाच्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढत आहेत. यामुळे सैरभैर झालेल्या श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी डोंबिवली येथील एका कार्यक्रमात आमदार राजू पाटील यांच्यावर निशाना साधताना, केक कापून कोणी खासदार होत नसतो त्यासाठी काम करावं लागतं अशी टीका केली होती. याला उत्तर देताना राजू पाटील यांनी शेलक्या शब्दात श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला चोख उत्तर दिले.

ठेकेदार आणि मिंधेंची मिलीभगत चव्हाटय़ावर
एक ’नाथ’ आहे घरी म्हणून ही मुजोरी? बापाने पॉकेटमनीसाठी एमएमआरडीए, एमएसआररडीसीचा निधी दिल्यामुळे करोडोच्या बाता मारल्या जात आहेत. या निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील समस्या मात्र सुटल्या नाहीत. रेल्वेच्या प्रवाशांना तर रोज मरणयातना भोगाव्या लागतात असे ट्वीट करत राजू पाटील यांनी ठेकेदार आणि मिंधें यांची मिलीभगत चव्हाटय़ावर आणली आहे.