
मसाल्यात भेसळ करणाऱयांचे पंबरडे मोडण्यासाठी एफडीएने मोहीम हाती घेतली आहे. मसाला उत्पादक, विव्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी एफडीएने कडक आदेश जारी केले आहेत.
मसाल्यांमध्ये भेसळ करणे, कृत्रिम रंगांचा वापर करणे किंवा पॅकेटवर खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करणे यावर पूर्णपणे बंदी घातली असून या नियमांचे उल्लंघन करणाऱयांना 7 वर्षे पैद आणि 10 लाखांच्या दंडाची तरतूद आहे आणि प्रसंगी मोक्का लावण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुटे मसाले विकण्यावरही निर्बंध घातले आहेत.
मसाल्यांमध्ये भुसा, कृत्रिम रंग किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करणे आवश्यक असेल, असे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नव्या नियमांनुसार, मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, औद्योगिक रंग किंवा अर्क काढलेल्या निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांची भेसळ करण्यास सक्त मनाई आहे. वैध परवान्याशिवाय हळद, तिखट, मिरची, दालचिनी, काळीमिरी, खसखस आदी मसाल्याच्या पदार्थांची आणि तयार मसाल्यांची विक्री करता येणार नाही.


























































