मृणालचं ठरल! प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय

मृणालचे आजोबा उपजिल्हाधिकारी होते, निवृत्तीनंतर ते शेतीत रमले

Netflix सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या लस्ट स्टोरीजच्या सिक्वलमध्ये झळकलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपली लोकप्रियता मेहनतीने मिळवली आहे. तिच्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्येच नाही तर टॉलीवूडमध्येही तिने अनोखी ओळख निर्माण केली आहे. मृणालने अलीकडेच कलाकारांना त्यांच्या आयुष्यात सहन कराव्या लागणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने सांगितले की, आम्हा कलाकारांना अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे शरिराबाबत आंम्हाला नेहमीच सतर्क राहावे लागत असल्याचेही तिने सांगितले. तसेच मृणालने स्त्रीबीजं गोठवण्याबाबत भाष्य केले.

मृणाल ठाकूरने नुकतीच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखक दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्य़ाबाबत काही खुलासे केले आहेत. अभिनेत्री मोना सिंगने स्त्रीबीजं गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या संदर्भात मृणाल म्हणाली की, मला माहित आहे आयुष्यात एखाद रिलेशनशिप सांभाळण किती कठीण आहे. त्यामुळे आपल्याला आपला स्वभाव, आपल्या कामाचे स्वरूप समजणारा जोडीदारी गरज असते. आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घेतल पाहिजे. त्यामुळे मी देखील स्त्रीबीजं गोठवण्याबाबत विचार करत असल्याचे तिने यावेळी सांगितले.

मृणालने कलाकारांवर होणाऱ्या बॉडी शेमिंगवरही भाष्य केले. यावेळी ती म्हणाली की, कलाकारांना अनेक त्यांच्या शरीर रचनेवरून हिणवल जातं. शरीराच्या विशिष्ट आकाराबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे मी आता माझ्या बॉडी कर्व्सना दाखवून लोकांमधील सुंदरतेची व्याख्या बदलणार आहे. आधी मला या सगळ्याची भीती वाटायची. मात्र आता मला काहीच वाटत नाही. स्त्रीचे सौंदर्य ठरवण्यासाठी आपल्याला कार्दशियनची आवश्यकता आहे का? रस्त्य़ावर चालणारी प्रत्येक महिला ही सुंदरच आहे. असे मत मृणालने व्यक्त केले.

मृणाल 2022 मध्ये ‘सीता रामम’, 2023 मध्ये ‘हाय नन्ना’ आणि ‘द फॅमिली स्टार’ या चित्रपटांमध्ये दिसली. ‘सीता रामम’ आणि ‘हाय नन्ना’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तर ‘द फॅमिली स्टार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान मृणाल लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या पुढील निर्मिती असलेल्या ‘पूजा मेरी जान’ या हिंदी सिनेमात दिसणार आहे.