चेन स्नॅचरने पोलिसांवरच ठेवला होता वॉच, दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर चोरट्याला पकडण्यात यश

गेली दीड वर्ष चेन स्नॅचरच्या शोधात असलेल्या पोलिसांना अखेर चोराला जेरबंद करण्यात यश आले आहे. पोलीसांची अनेक पथके त्याच्या शोधासाठी पाठवूनही तो कोणाच्याच हाताला लागला नाही. उलट या चोरट्यानेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांवर वॉच ठेवला होता. विशेष म्हणजे या कामासाठी त्याने 8 जणांना पगारावर कामाला ठेवले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजल अलिस अलिमामा शेख अलिस इरानी (28) असे त्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याने त्याच्याकडे सीसीटिव्ही इन्स्टॉल केला होता ज्याच्याद्वारे त्याला पोलिसांचे पथक आल्यावर अलर्ट मिळायचा आणि तो सतर्क होऊन पळून जााण्यास यशस्वी व्हायचा. त्याच्या पत्नीसह आठ महिला त्याला पळण्यास मदत करायच्या. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठ वर्षात त्याने मुंबईसह ठाण्यात 56 वेळा चोरी केली आहे. एमआयडीसी पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी घाटकोपर झोपडपट्टीत असलेल्या घरी या चोरट्याला अटक केली आहे. अंधेरी येथील उर्मिला मिश्रा या 60 वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले होते. त्या देवळात जात असताना 3 मार्च 2022 रोजी सकाळी 8.10 च्या सुमारास त्याने त्यांच्या गळ्यातील 24 ग्रॅमचे मंगळसूत्र ओढले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

अलीने नोव्हेंबर 2022 ला पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच पोबारा केला होता. त्याच्या पत्नीसह सात महिलांनी पळण्यास त्याला मदत केली होती., त्यावेळी या महिलांनी पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला होता. सब इन्स्पेक्टर पालवे यांनी सांगितले की, अलि विरोधात चार अजामिनपात्र वॉरन्ट काढण्यात आले असून त्याला भिवंडी येथील एका दरोड्याच्या प्रकरणात मोक्काही लावण्यात आला होता. त्याला स्नॅचिंग प्रकरणात याआधीही अटक करण्यात आली होती. त्याने पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली होती. त्याने घरात सीसीटिव्ही फुटेज लावले होते आणि त्यावर देखरेख करण्यासाठी 8 माणसांना पगार देऊन टीप देण्यासाठी ठेवले होते. त्याच्या घराशेजारी जवळपास अंतरावर पोलीस आल्यावर ही लोकं त्याला सतर्क करायचे. पालवे यांनी पुढे सांगितले की, अली घाटकोपर येथील पनकेशा बाबा दर्ग्याजवळ राहत होता. तिथून त्याला अटक केली. ही कारवाई डीसीपी डी नलावडे, वरिष्ठ पोलीस सतिश गायकवाड, यश पालवे, कॉन्स्टेबल शंकर काळे, हनुमंत पुजारी, नितीन नलावडे, शिवा पवार, प्रदिप चव्हाण आणि अमोल पवार यांनी केली असून अलि याला ताब्यात घेतले.