‘वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी मुस्लिम पाकिस्तानला साथ देतील’, माजी गोलंदाजाचे वादग्रस्त विधान

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान हिंदुस्थानात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 होणार आहे. 15 ऑक्टोबरला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. या हाय-व्होल्टेज मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते, क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी यावर आपले मत मांडले आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेदने या सामन्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हिंदुस्थानातील मुस्लिम विश्वचषकात पाकिस्तान संघाला पाठिंबा देतील, असे तो म्हणाला आहे. नावेदने नादिर अलीच्या पॉडकास्टवर हे विधान केले. नावेदने पाकिस्तानसाठी 74 एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषकात हिंदुस्थान आणि पाकिस्तान आमनेसामने येतील, असा सवाल नादिरने पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाला केला. एक गोलंदाज म्हणून याविषयी तुमचे काय मत आहे? तुम्ही वर कोणता संघ पाहत आहात? यावर उत्तर देताना नावेद म्हणाला की, “हिंदुस्थानी संघ हिंदुस्थानात खेळत असेल, तेव्हा तो नक्कीच आवडता असेल.” पाकिस्तानचा संघही चांगला आहे. त्यामुळे चांगला सामना होईल. गर्दीचा प्रश्न पाहता मला वाटते की तेथे खूप मुस्लिम आहेत. त्यांचा आम्हाला पाठिंबा असेल. हिंदुस्थानी मुस्लिम आम्हाला खूप पाठिंबा देतात. मी हिंदुस्थानात अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये दोन मालिका खेळल्या आहेत.”

नावेद पुढे म्हणाला की, “आम्ही इंडियन क्रिकेट लीग (ICL) खेळलो आहोत. इंझमाम-उल-हक आयसीएलमध्ये कर्णधार होता. त्यात आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला. आम्ही जगातील सर्व संघांसोबत खेळलो. तिथे असलेली गर्दी आम्हाला साथ देते. आम्‍हाला आशा आहे की, दोघांमध्ये चांगली टक्कर होईल.