नरेंद्र मोदी म्हणतात, ईडीची 97 टक्के प्रकरणे राजकीय नाहीत

ईडी उत्तम काम करत असून 97 टक्के प्रकरणे अशा लोकांशी संबंधित आहेत ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, असा दावा मोदी यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, आपचे नेते मनीष सिसोदीया, खासदार संजय सिंह, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ईडी, सीबीआय, आयटीला हाताशी धरून तुरुंगात डांबण्यात आले. असे असताना मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वेगळाच सूर आळवल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

ईडी आणि सीबीआयशी निगडित कुठलेही कायदे भाजपच्या वेळी आलेले नाहीत. उलट भाजप सरकारने निवडणूक आयोगात बदल करण्यासाठी कायदे आणले, असेही मोदी म्हणाले.

पकडले गेले म्हणूनच मुलाखत -राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडले गेले म्हणूनच ते वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत सुटले आहेत, निवडणूक रोखे हा या पृथ्वीतलावरचे मोठे खंडणीचे रॅकेट आहे अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर तोफ डागली. जर तुम्ही मोदींच्या डोळ्यात पाहाल तर तुम्हाला याचा अंदाज येईल, असेही राहुल गांधी म्हणाले. सीबीआयची कारवाई होते आणि दुसऱया दिवशी पंपनीकडून पैसे मिळतात. त्यानंतर कारवाई बंद होते, ते कसे हे मोदींनी सांगावे. पंपनी पैसे देते तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरसह मोठमोठी हजारो कोटींची पंत्राटे त्यांना मिळतात ते कसे हेदेखील मोदींनी सांगावे. या सर्व घोटाळ्याचे मास्टर माईंड मोदीच आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.