शरद पवार यांच्या पक्षाचा शपथनामा प्रकाशित; केल्या अनेक घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. त्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे.  या जाहीरनाम्यात महिला सक्षमीकरण आणि शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पक्षाकडून महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा आणि महिला आरक्षणासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. तसेच सत्तेत आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती बंद करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा यात करण्यात आली आहे.

सत्तेत आल्यानंतर जातीनिहाय जनगणाना करण्यात येणार असून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागिरकांसाठी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आरोग्यासाठी 2028-29 पर्यंत अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्के वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सफाईसाठी महत्त्वाचे प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि शेतीविषयक वस्तूमवर शून्य जीएसटी आमच्या राज्यात असेल. खासगीकरणा सर्व क्षेत्रात सुरू आहे. त्याला पायबंद घालण्यात येणार आहे.

संरक्षण क्षेत्रात महिलांच्या सहभागावर काम करण्यात येणार आहे. अग्निवीर योजना रद्द करण्यात यावे, ही आमची भूमिका आहे. त्याबाबत काम करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. लोकसभा निवडणुका घेणे कठीण असताना आपल्यासाठी वन नेशन. वन इलेक्शन आपल्यासाठी लांब आहे. न्यायव्यावस्था अद्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली.