सावधान ! मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवायची सवय ठरु शकते जीवघेणी

सावधान तु्म्हालाही मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवायची सवय आहे तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. अनेकांना मोबाईलच्या कव्हरच्या मागे 10, 20, 50, 100, 500 च्या नोटा ठेवायची सवय असते. अनेकांना वाटतं त्यात पैसे ठेवले तर गरजेच्यावेळी उपयोगी पडतात. मात्र ही सवय जीवघेणी ठरु शकते. फोनच्या मागील कव्हरमध्ये नोट ठेवणे हे धोकादायक आहे.

अनेकदा फोनच्या अति वापरामुळे तो गरम होतो. जसा फोन गरम झाल्यावर फोनच्या मागील बाजू जळू लागते. अशावेळी जर तुमच्या फोनच्या कव्हरमध्ये एखादी नोट ठेवली असेल तर फोनची उष्णता बाहेर सोडता येत नाही यामुळे मोबाईलचा स्फोटही होऊ शकतो. तसेच तज्ज्ञांच्या मते मोबाईलला जास्त टाईट कव्हर लावू नये. कारण त्यामुळेही मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.

या नोटा कागदापासून बनवल्या जातात आणि त्यावर अनेक प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. अशातच फोन गरम झाला आणि नोटा ठेवल्यामुळे उष्णता बाहेर पडण्यास जागा न मिळाल्याने त्यावेळी आग लागू शकते, नोटांवर असलेल्या रसायनांमुळे ही आग आणखी वाढू शकते. अशावेळी मोबाईल कव्हरच्या मागे चुकूनही कोणत्याही प्रकारची नोट ठेवू नका. आणि फोनचे कव्हर अतिशय काळजीपूर्वक लावा, कारण कव्हर जर घट्ट असेल तर मोबाईलच्ब्लाया स्फोट होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची जोखीम घेऊच नये. शिवाय फोनला कव्हर लावतानाही त्याची काळजी घ्यायला हवी.