शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाचा उत्साह; श्रींची प्रतिमा, पोथी, विणेची मिरवणूक

श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला व-हाडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्रधान जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला. श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात त्यांनी श्रींची पाद्यपूजा केली. दानशूर साईभक्त वेंकटा सुब्रमण्‍यम, बंगळुरू यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली आहे.