ऑनलाईन टास्कच्या नावाखाली घालायचा गंडा

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली टास्क देऊन फसवणूक करणाऱयाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नुमेश निकम असे त्याचे नाव आहे. तक्रारदार हे अंधेरीच्या लोखंडवाला येथे राहतात. मे महिन्यात त्यांना मोबाईलवर एकाचा मेसेज आला. एका पंपनीत पार्ट टाइम रिसेप्शनिस्टची नोकरी असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद होते. पार्ट टाइम नोकरी केल्यास घरबसल्या 20 ते 85 हजार रुपये कमावता येतील. यू-टय़ुबवरचे व्हिडीओ लाईक केल्यास अधिक पैसे मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. जर नोकरीकरिता होकार असल्यास रिप्लाय द्यावा असे त्या मेसेजमध्ये होते. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने रिप्लाय देऊन होकार दिला. होकार दिल्यावर त्यांना यू-टय़ुबवरचे व्हिडीओ पाठवण्यात आले. ते व्हिडीओ लाईक केल्यास 50 रुपये मिळतील असे सांगितले गेले. व्हिडीओ लाईक केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा असे सांगून त्यांना टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये जोडून घेतले.

तक्रारदार याने त्याची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती एका लिंकवर अपलोड केली. माहिती अपलोड केल्यावर त्याच्या खात्यात सुरुवातीला 150 रुपये आले. त्यानंतर प्रीपेड टास्कच्या नावाखाली त्याच्याकडून 2 लाख 92 हजार रुपये उकळले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. परिमंडळ-9चे पोलीस उपायुक्त कृष्णकुमार उपाध्याय यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय माडये, उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, अशोक काsंडे, विक्रम सरनोबत, अनिल पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला.