पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसून ताज हॉटेल उडवणार, पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणारा गजाआड

दोन पाकिस्तानी दहशतवादी समुद्रामार्गे मुंबई येथे येऊन ताज हॉटेल उडविणार आहेत, अशी माझ्या फेसबुकवर उर्दू भाषेत पोस्ट आली असल्याचे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सांगून घबराट पसरविण्याचा प्रयत्न करणाऱया जगदंबा प्रसाद सिंग (24) या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने आज पकडले. कौटुंबिक समस्यांमुळे आलेल्या नैराश्यातून जगदंबा याने हा खोडसाळपणा केला होता असे पोलिसांकडून सांगण्यात येते.

गुरुवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. समोरून बोलणाऱया व्यक्तीने स्वतःचे नाव मुकेश सिंग असे सांगून तो यूपीच्या गाझियाबाद येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्याला त्याच्या फेसबुक खात्यावर उर्दू भाषेत पोस्ट प्राप्त झाली की, दोन पाकिस्तानी नागरिक समुद्रामार्गे मुंबईत येऊन ताज हॉटेल उडविणार आहेत, असे सांगून त्याने पह्न ठेवला. त्यामुळे याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. सहाय्यक आयुक्त महेश देसाई, वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन पुराणिक, एपीआय महेंद्र पाटील तसेच सुनील म्हाळसंक, राहुल पवार, वैभव पाटील, शार्दुल बनसोडे, सुशांत गवते, प्रशांत भुमकर यांनी कॉलरचा शोध सुरू केला.

कॉलरने कॉल करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल पह्नची माहिती काढली असता, सदर आरोपी सांताक्रुझ परिसरात असल्याचे समजून आले. त्यानुसार पथकाने सांताक्रुझ परिसरात सापळा रचून कॉलरला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना खोटी माहिती देण्याकरिता वापरलेला मोबाईल पह्न मिळून आला. त्यावरून सदर गुन्हा याच आरोपीने केल्याची खात्री झाली. आरोपीने त्याचे नाव मुकेश सिंग असे सांगितले होते, परंतु ते नाव खोटे असून त्याचे खरे नाव जगदंबा प्रसाद सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील कारवाईकरिता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काwटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समजते.