‘जर तरची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ

एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील गोड जोडपं म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या जोडप्याची  रंगभूमीवरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते.  सोनल प्रॉडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.

अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत, तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. पहिल्या प्रयोगाविषयी नंदू कदम म्हणाले, ‘‘ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट विक्री सुरू झाल्यापासूनच नाटय़ रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सर्व वयोगटांना आवडेल असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’