पोलीस आयुक्तांचा बदली दरबार, कर्मचार्‍यांना चॉईस पोस्टिंग

पुणे शहर पोलीस दलातील कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष समोर उभा करून खूल्या दरबारामध्ये बदल्यांची अनोखी प्रक्रिया आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पार पाडली. बदलीपात्र कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष आयुक्तालयात बोलवून दरबार भरविण्यात आला. त्यानंतर आयुक्तांसमोर ‘कुणाला कोठे बदली पाहीजे, असे विचारून तेथे नियुक्ती करण्यात आली. यात अनेकांना चॉईस पोस्टिंग मिळाल्याने कर्मचार्‍यांनीही आनंद व्यक्त केला. आयुक्तालयात प्रथमच अशा पारदर्शक पद्धतीने बदल्या झाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपस्थित होते. यावेळी जवळपास 81 कर्मचार्‍यांचा बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार पदभार स्विकारल्यानंतर चांगलेच अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पहिल्या आठवड्यात पुण्यातील नामचिन गुंडाना आयुक्तालयात बोलावून त्यांची हजेरी परेड घेण्यात आली. त्यानंतर अंमली पदार्थ तस्करांना बोलावून त्यांनाही सूचना देण्यात आल्या.

पोलीस दलातील बदल्या देखील खूल्यापद्धतीने दरबार भरवून करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले होते. त्यानgसार शुक्रवारी सकाळी आयुक्तालयात पोलीस दरबार भरविण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात बदलीपात्र जवळपास 81 जण उपस्थित होते. या सर्वांच्या दरबारामध्ये बदल्या करण्यात आल्या. शहर पोलीस ठाणे, त्यातील रिक्तपदे याची माहिती आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार ज्या पोलीस ठाण्यात रिक्तपदे आहेत, त्या पोलीस ठाण्यांची नावे सर्वांसमोर प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर कर्मचार्‍यांना समोर उभे करून त्यातील कोणते पोलीस ठाणे पाहfजे, हे विचारून त्यांची त्याठिकाणी बदली करण्यात आली. यामध्ये बुतांश जणांना आवडत्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली.

पोलीस दलात बदल्यांसाठी बड्या हस्तींचा संपर्क आणि अर्थिक ताकद लागते, अशी चर्चा वारंवार होते. या चर्चेला आयुक्तांनी पुर्णविराम दिला असून पारदर्शक पद्धतीने सर्वांसमोर दरबारामध्ये बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

“पोलीस कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष समोर उभे करून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार बदल्या झाल्या. प्रशासकीय दृष्टीकोनातून प्रथम पर्याय शक्य नसल्यास दुसर्‍या पर्यायाच्या ठिकाणी बदली करण्यात येते. यापुढे देखील अशाप द्धतीने बदल्या केल्या जातील.”

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.