रोहन धुरी ’आर.एम. भट श्री’, मेन्स फिजिक्समध्ये प्रतीक साळकी किजेता

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या स्पर्धेत रोहन धुरीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ‘आर. एम.भट श्री’ स्पर्धेवर आपले नाव कोरले. धुरीला कडवी झुंज देणारा संजय जाधव उपविजेता ठरला. प्रणव खातू बेस्ट इम्प्रूव्हमेंट खेळाडू ठरला. तसेच मेन्स फिजिक्समध्ये प्रतीक साळवीने बाजी मारली

यंदाची ‘आर. एम. भट श्री’ शरारसौष्ठव स्पर्धादेखील रंगतदार झाली. यंदा ‘आर. एम. भट श्री’ स्पर्धा परळ, लालबाग, काळाचौकी, नायगाव विभागातील खेळाडूंसाठी खुली करण्यात आल्यामुळे रंगतदार झाली. प्रत्येक गटात पीळदार खेळाडू असल्यामुळे अव्वल खेळाडूची निवड करताना पंचांचे कसब पणाला लागले.  ‘राम जी कि निकली सवारी…’या गाण्यावर अफलातून पोझिंग करत उपस्थितांची मनं जिंकणारा ओमकार साईम हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संदीप जाधव, जालिंदर आपके, प्रवीण गणवीर, अमर भंडारी यांनी स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी माजी ‘आर. एम. भट श्री’ विजेते खेळाडूदेखील उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाई आंबोले, विक्रांत देसाई, काशीनाथ जाधव, विष्णू घाग, भूषण पाटकर, अभिषेक फुटाणे, हेमल राणा, सुशांत चौगुले, अभिषेक मानकर यांनी मेहनत घेतली.