
रेल्वेने प्रवास करताना चोरीला गेलेले किंवा हरवलेले तब्बल 2 कोटी 49 लाख 75 हजार रुपये किमतीचे 1 हजार 665 मोबाईल रेल्वे पोलिसांनी एका धडक मोहिमेत हस्तगत केले. हे सर्व मोबाईल कायदेशीर पडताळणीनंतर मूळ मालकांना परत करण्यात आले.
लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरीला जातात. 2024, 2025 आणि जानेवारी ते जून 2026 या कालावधीत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या विविध पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने ‘विशेष शोध मोहीम-3’अंतर्गत ही कारवाई केली. मोबाईल आयएमइआय आधारित तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रकिंगचा वापर करून शोधण्यात आले.


























































