ड्रेसकोडच्या निर्णयाविरोधात शिक्षक सेनेचे आंदोलन

शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांवर केलेली ड्रेसकोडची सक्ती तसेच सुधारित संचमान्यतेचे निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य शिक्षक सेनेने शिक्षण निरीक्षक उत्तर व पश्चिम विभागीय कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारने हे दोन्ही जाचक निर्णय तातडीने रद्द करावेत, या मागणीचे निवेदन शिक्षण निरीक्षकांना देण्यात आले.

शिक्षकांना त्यांच्या पेहरावाचे भान असून शिक्षकांच्या पोशाखाविषयी आतापर्यंत कोणतीच तक्रार आलेली नाही. तसेच नव्याने आणलेली संचमान्यताही अतिशय जाचक असून त्यामुळे अनेक शाळा एकशिक्षिकी होणार असून विद्यार्थ्यांना विषय शिक्षकच मिळणार नाहीत. त्यामुळे हे दोन्ही शासन निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षक सेनेची आहे.

शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई कार्यालय चेंबूर व मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालय जोगेश्वरी पूर्व  येथे शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज.  मो. अभ्यंकर  राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, मच्छिंद्र खरात, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, ज्युनिअर कॉलेज विभाग सरचिटणीस मंगेश पाटील, पैलास गुंजाळ, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब घाडगे, राजू जाधव, प्रवीण शिंपी, निरंजन बोरसे, अशोक पाटील, विजय गवांदे, उत्तम चव्हाण संजय मेकले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले.

त्याचबरोबर मुंबई पश्चिम जोगेश्वरी शिक्षण निरीक्षक कार्यालयात मुंबई पश्चिम अध्यक्ष हितेंद्र चौधरी, त्याचबरोबर सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, प्रादेशिक सचिव मुकेश शिरसाठ, संतोष तामानकर, संतोष शेलार, विजयकुमार सिंग, मंगेश पवार, सतार खान, दिलीप पुंडकर, सुरेंद्र रायबोले, शिवाजी माळी, अशोक जाधव यांनी शिक्षण निरीक्षक नवनाथ वनवे आणि अधीक्षक महेश खामकर यांना निवेदन सादर केले.