राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपला सत्तेतून तडीपार करा -डॉ. भालचंद्र मुणगेकर

देशात होणारी यंदाची लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. भाजपचा चारशे पारचा नारा राज्यघटना बदलण्यासाठीच आहे. त्यामुळे लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजप व नरेंद्र मोदी यांना सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त टिळक भवनात आयोजित कार्यक्रम डॉ. भालचंद्र मुणगेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपचा लोकशाही व राज्यघटनेवर विश्वास नाही. माजी सरसंघचालक गोळवलकर यांनी राज्यघटना ही गोधडी आहे असे म्हटले होते. भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी 400 जागांचे बहुमत मिळाले की राज्यघटना बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार यांनीही नवीन राज्यघटना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक प्रचारसभेत राज्यघटना बदलणार नाही असे मोदी सांगत असले तरी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.