कोरोनामुळे चव, गंधच नाही तर आवाजही जाऊ शकतो, संशोधनात आले समोर

कोरोनासंदर्भातील आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. एका संशोधनानुसार कोरोनामुळे केवळ चव, गंधच नाही तर आवाजही जाऊ शकतो असा खुलासा झाला आहे. जर्नल पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून ही माहिती समोर आले आहे. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसीस असे म्हणतात. ज्याचा संसर्ग घशातही होतो. ज्याने हळूहळू बोलण्याची क्षमता गमावू शकता. हे अत्यंत धोकादायक आहे.

ओमायक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट Jn.1 व्हेरिएंटमुळे चीन-सिंगापूरमध्येच नाही तर हिंदुस्थानातील अनेक भागात संसर्ग वाढला आहे. डेल्टा व्हेरियंटप्रमाणे मृत्यू दर आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले नाही, मात्र कोरोनामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे त्रास देऊ शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाचा संसर्ग घशातही होतो. जर्नल पेडियाट्रिक्समध्ये ‘बिलेटरल व्होकल कॉर्ड पॅरालिसीस रिक्वायरिंग लॉंग टर्म ट्रेकेओस्टोमी आफ्टर SARS-CoV-2 इन्फेक्शन’ नावाने प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधनानुसार, कोरोनामुळे केवळ चव, गंधच नव्हे तर आवाजही जाऊ शकतो.

जीएनसीटीडी मंत्री (आरोग्य) सौरभ भारद्वाज यांनी नोव्हेंबर-2023 या कालावधीत चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियासह श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर 30 नोव्हेंबर रोजी श्वसन औषध तज्ञांसोबत बैठक बोलावली होती. ज्यामध्ये आरटी-पीसीआरद्वारे न्यूमोनियाच्या गंभीर प्रकरणांची चाचणी करणे, नमुन्यांचा तपशील राखणे आणि अँटी-व्हायरल औषधांचा पुरेसा साठा राखणे यावर एसओपी जारी करण्यात आला. यामध्ये 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत सर्व रूग्णालयांमध्ये विविध बाबींवर तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले.

कोरोनाचा धोका पाहता 20 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सर्व आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये दर तीन महिन्यांनी कोविड चाचणी आणि रुग्णालयांच्या मॉक ड्रिलवर चर्चा करण्यात आली.