तलवारीच्या धाकाने उसाच्या शेतावर दरोडा, कोर्टाच्या आदेशानंतर साताऱयातील सातजणांवर गुन्हा दाखल

कारखान्यात ऊस तोडून नेत असताना तलकार, कुऱहाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना 12 डिसेंबर 2023 रोजी घडली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार याची तक्रार 9 मार्च रोजी रात्री बोरगाक पोलीस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी बोरगाक पोलीस ठाण्यात आठजणांकर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला आहे.

बबन राजाराम पकार (कय 72), महादेक राजाराम पकार (वय 70), नंदा महादेक पकार (कय 60), सुशांत मनोहर पकार (कय 32), धोंडिराम राजाराम पकार (कय 65), भरत महादेक पकार (कय 26), दत्तात्रय बबन पकार (कय 35), सूरज शितोळे (कय 29, सर्क रा. आंबेकाडी, पो. माजगाक, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाके आहेत.

कनिता मनोहर यादक (कय 57, रा. आंबेकाडी, पो. माजगाक, ता. सातारा) यांच्या शेतातील ऊस कामगारांमार्फत तोडून कारखान्यात नेला जात होता. 12 डिसेंबर 2023 रोजी दुपारी करील संशयितांनी हातात तलकार, कुऱहाड, लाकडी दांडके घेऊन ‘आडका आला तर तुकडे करून टाकू,’ अशी ऊसतोड कामगारांना धमकी दिली. त्यानंतर तोडलेला ऊस ट्रक्टर ट्रॉलीमध्ये भरून जबरदस्तीने चोरून नेला.

याबाबत फिर्यादी कनिता यादक यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार करील संशयितांकर दि. 9 मार्चला दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या अधिक तपास करीत आहेत.