‘सालार’ सुसाट…

प्रभासचा चित्रपट ‘सालार’ने चौथ्या दिवशी 42 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 251 कोटी 60 लाखांवर पोहोचले आहे.

‘सालार’ हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेलुगू, तामीळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला ‘सालार’ने 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱया दिवशी 56.35 कोटी आणि तिसऱया दिवशी 62.5 कोटींची कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या ‘सालार’ ने 42.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. जगभरात चित्रपटाचे 325 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे.