Share Market News – सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक, अवघ्या 10 मिनिटात 3 लाख कोटींची कमाई

शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस आले आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. गुरुवारी बाजार उघडताच सेक्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली. खरेदीचा सपाटा सुरू झाल्याने शेअर बाजार शिखरावर पोहोचला.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे सकारात्मक परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारात उमटले. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 900 अंक वाढला आणि 70485 पारा पोहोचला. तर निफ्टीतही 251 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आणि 21,177 वर पोहोचला. यामुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजारमुल्य अवघ्या 10 मिनिटांमध्ये 3 लाख कोटी रुपयांनी वाढून 354.19 कोटींवर पोहोचले.

गुरुवारी सेन्सेक्स 561 अंकांच्या तेजीसह ऑल टाईम हाय 70146 वर ओपन झाला. तर निफ्टी 184 अंकांच्या वाढीसह 21110 वर ओपन झाला. त्यानंतर सेन्सेक्टमध्ये 900 हून अधिक अंकांची, तर निफ्टीमध्ये 250 हून अधिक अंकांची वाढ झाली. अर्थात या तेजीमागील कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हने घेतलेला एक निर्णय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, शेअर बाजारामध्ये तेजीचा परिणाम शेअर्सच्या किंमतींवरही झाला आहे. एचसीएल टेक, इन्फोसिस, एमएचपीएसीस आणि कार्गोज या आयटी कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून आली. यासह बँक, फायनान्स शेअरमध्येही वाढ नोंदवण्यात आली.