शेअर बाजाराचा नवा उच्चांक; सेन्सेक्स 73 हजार तर निफ्टी 22 हजारांपार

शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस आले आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. सोमवारी बाजार उघडताच सेक्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली. खरेदीचा सपाटा सुरू झाल्याने शेअर बाजार शिखरावर पोहोचला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली. सुरुवातीलाच सेन्सेक्स 650 अंक, तर निफ्टी 180 अंकांनी वाढला. त्यामुळे सेन्सेक्सने 73 हजारांचा, तर निफ्टीनेही 22 हजारांचा टप्पा ओलांडलत नवा उच्चांक रचला. आज 2160 शेअरमध्ये तेजी, तर 437 शेअरमध्ये मंदी दिसून आली.

विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, एलटीआयमाइंडट्री आणि इंफोसिस हे शेअर चांगलेच वाढल्याचे, तर एचडीएफसी लाईफ, आयशर मोटर्स, एचयूएल, हिंडाल्को आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरने मात्र लाल सलाम ठोकला.