opposition meet : शरद पवार विरोधकांच्या ‘डिनर’साठी उपस्थित राहणार नाहीत; जाणून घ्या काय आहे कारण

पुढल्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची वज्रमुठ तयार होत आहे. यासाठी विरोधक एकत्र येत असून त्याचा पहिला टप्पा पाटण्यात पार पडला. यानंतर आज म्हणजे 17 जुलै आणि 18 जुलै रोजी दुसरा टप्पा कर्नाटकातील बंगळुरू येथे पार पडणार आहे. याबैठकीचं आयोजन काँग्रेसनं केलं असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे.

या डिनरकडे आणि उद्या होणाऱ्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्षं आहे. 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे. या बैठकीचा अजेंडा आणि संपूर्ण कार्यक्रमही देखील निश्चित करण्यात आला आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजच्या ‘डिनर’साठी उपस्थित राहणार नसल्याचं कळतं आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे दोघांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की दोघे नेते उद्या (मंगळवार, 18 जुलै रोजी) विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पळवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातच आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शरद पवार यांच्या पक्षात बंड झाल्यानं अधिवेशनात त्यांच्या सोबतचे आमदार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शरद पवार आमदारांची बैठक बोलावणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार उद्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं बोलवलं जात आहे.