
शिर्डीतील साई चरणी भाविकांनी वर्षभरात भरभरून दान केले आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षी मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल 14 कोटींची वाढ झाली आहे. 2024-25 मध्ये साईबाबा संस्थानचे एकूण उत्पन्न 648 कोटी रुपये होते. तर 2025-26 मध्ये हे उत्पन्न 638 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच उत्पन्नात 10 कोटींची घट नोंदविण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, साईबाबा संस्थानला वस्तू स्वरूपात 15 कोटींचे देखील अतिरिक्त दान भक्तांकडून प्राप्त झाल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली.



























































