मिंधेसारखे निर्लज्जपणे झुकले नाहीत म्हणूनच सूरजला सतावले जातेय – आदित्य ठाकरे

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार व मिंधे गटाला फटकारले आहे.

‘लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर, अशीच ही मिंधे राजवट. मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे! भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत! नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते. स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन, सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू. लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच. महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे’’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना काळातील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर यात ईडीची एण्ट्री झाली. मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चव्हाण यांनी ईडीला वेळोवळी तपासात सहकार्यही केले होते. त्यानंतरही आज सायंकाळी ईडीचे अधिकारी चव्हाण यांच्या अटकेची कारवाई केली